Sunil Dr. Jogi
१४ एप्रिल, १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावात जन्मलेल्या डॉ. भीमराव आंबेडकर आपल्या सैन्यात कार्यरत असलेल्या वडिलांचे चौदावे रत्न होते. एका महार जातीच्या दलित कुटुंबात जन्मलेल्या भीमरावने जन्मापासूनच त्या कठीण परिस्थितीला विचारपूर्वक सहन करणे सुरु केले होते, जिला दलिताने नशीब म्हणून स्वीकारले होते. त्यांनी शिक्षणाला असे माध्यम म्हणून ग्रहण करणे सुरू केले ज्यामार्फत ते या अमानवीय स्थितीतून दलितांना मुक्त करू शकतील. भणंगपणा तसेच कठीण परिस्थिती असताना भीमराव आंबेडकरांने एम.ए.अर्थशास्राची पदवी कोलंबिया विद्यापीठातून घेतली आणि तिथेच आपल्या समस्या आणि त्याची उत्तरे शोधण्याची दृष्टि स्वतःमध्ये निर्माण केली. याच प्रतिभा आणि निर्भीड वचनबद्धतेच्या बळावर डॉ. भीमराव आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे निर्माता बनले आणि त्यात दलितांच्या स्थितीत अपेक्षित सुधारणा करण्याच्या हेतूने अनुकूल व्यवस्था केली. या पुस्तकात खास करून डॉ. आंबेडकर यांच्या त्या बावीस प्रतिज्ञा पाहिल्या जावू शकतात ज्या त्यांनी जीवनभर पाळल्या, ज्यामुळे ते महान बनू शकले.